विद्यार्थी मित्रांनो आपल्या MPSC 4 SURE या वेबसाईटवर आपण महिला व बाल विकास, अंगणवाडी मुख्य सेविका, तलाठी भरती, नगरपरिषद, जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहोत.
1) भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेद अंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आली आहे 1) अनुच्छेद 14
2) अनुच्छेद 15
3) अनुच्छेद 17
4) अनुच्छेद 16
उत्तर - भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 अंतर्गत कायद्यापुढे समानता ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे
2) 1899 मध्ये , पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी कोणत्या नावाने शाळा उघडली ?
1) आर्य महिला समाज
2) कर्मभूमी
3) सेवा सदन
4) शारदा सदन
उत्तर - 1899 मध्ये पंडिता रमाबाईंनी विधवांसाठी शारदा सदन या नावाने शाळा उघडली
पंडिता रमाबाई यांनी मुंबई येथे 1889 रोजी शारदा सदन सुरू केले
3) भारताची पहिली नियमित जनगणना कोणत्या वर्षी सुरु झाली
1) 1951
2) 1881
3) 1891
4) 1872
उत्तर - भारताची पहिली नियमित जनगणना ही 1881 पासून सुरू झाली
4) देशबंधू ही पदवी कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाशी संबंधित आहे ?
1) बिपिनचंद्र पाल
2) रवींद्रनाथ टागोर
3) चित्तरंजन दास
4) जयप्रकाश नारायण
उत्तर - देशबंधू ही पदवी चित्तरंजन दास यांच्याशी संबंधित आहे
चित्तरंजन दास यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1870 मध्ये झाला
यांना आदराने देशबंधू या नावाने देखील संबोधले जाते
चित्तरंजनदास आणि मोतीलाल नेहरू यांनी 1923 मध्ये स्वराज्य पार्टीची स्थापना केली .
5) मुंबईत सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना कोणी केली होती ?
1) रमाबाई
2) आत्माराम पांडुरंग
3) एन एम जोशी
4) डॉ. आंबेडकर
उत्तर - मुंबईत सोशल सर्व्हिस लीग ची स्थापना श्री नारायण मल्हार जोशी यांनी 1909 मध्ये केली
6) खालीलपैकी कोणती नदी ही यमुना नदीची उपनदी नाही ?
1) बेटवा
2) चंबळ
3) केन
4) महानदी
उत्तर - यमुना नदीचा उगम उत्तराखंड मध्ये होतो
पुढील नद्या या यमुना नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत
1) बाणगंगा
2) चंबळ
3) बेटवा
4) केन
महानदी - ही दीपकल्पावरून वाहणारी नदी आहे
महानदीचा उगम छत्तीसगड राज्यांमध्ये दंडकारण्य मध्ये होतो .
7) कोणती नदी तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखले जाते ?
1) मांडवी नदी ( महादयी)
2) ब्रह्मपुत्रा नदी
3) दिबांग नदी
4) गोदावरी नदी
उत्तर - मांडवी (महादयी)नदी ही तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखले जाते .
8) खालीलपैकी कोणत्या समाज सुधारिकेने " हिंदू लेडीज सोशल क्लब" ची स्थापना केली होती ?
1) सावित्रीबाई फुले
2) ताराबाई शिंदे
3) गोदावरी परुळेकर
4) रमाबाई रानडे
उत्तर - हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना रमाबाई रानडे यांनी केलेली होती
9) 1815 मध्ये , आत्मीय सभेची स्थापना .... यांनी केली
1) राजा राममोहन रॉय
2) रवींद्रनाथ टागोर
3) स्वामी विवेकानंद
4) स्वामी दयानंद सरस्वती
उत्तर - आत्मीय सभेची स्थापना 1815 मध्ये राजा राममोहन रॉय यांनी केली
10) खालीलपैकी कोणत्या समाज सुधारिकेने 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केले ?
1) पंडिता रमाबाई
2) सावित्रीबाई फुले
3) ताराबाई मोडक
4) ताराबाई शिंदे
उत्तर - पंडिता रमाबाई यांनी 1889 मध्ये मुंबई येथे शारदा सदन सुरू केले
11) खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मोतीलाल नेहरू यांच्या सोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली ?
1) आर सी दत्त
2) महात्मा गांधी
3) डब्ल्यू सी बॅनर्जी
4) सी आर दास
उत्तर - चित्तरंजन दास यांनी मोतीलाल नेहरू यांच्यासोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली
12) स्पॅम ही संज्ञा कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
1) क्रिकेट
2) साहसी खेळ
3) संगणक
4) कला
उत्तर - स्पॅम ही संज्ञा संगणकाशी संबंधित आहे
13) भारत सेवक समाज चे संस्थापक कोण होते ?
1) गोपाळ कृष्ण गोखले
2) दादोबा पांडुरंग
3) दादाभाई नौरोजी
4) लोकमान्य टिळक
उत्तर - भारत सेवक समाज च संस्थापक गोपाळ कृष्ण गोखले हे होते
14) भारताचे उपराष्ट्रपती हे ...... चे पदसिद्ध अध्यक्ष असतात
1) राज्यसभा
2) विधान परिषद
3) लोकसभा
4) विधानसभा
उत्तर - भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
15 ) गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला ?
1) अरविंद घोष
2) महात्मा ज्योतिबा फुले
3) राजा राममोहन रॉय
4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर - गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे


0 टिप्पण्या