तलाठी भरती 2024 - मागील प्रश्नपत्रिक संच मराठी Talathi bharati previous year question paper marathi

        विद्यार्थी मित्रांनो आपल्या MPSC 4 SURE या वेबसाईटवर आपण महिला व बाल विकास, अंगणवाडी मुख्य सेविका, तलाठी भरती, नगरपरिषद, जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहोत.                                         
                                          तलाठी भरती
 तलाठी भरती -  2024 मध्ये झालेल्या परीक्षा मधील मराठी चे प्रश्नसंच उपलब्ध करून दिले आहेत 
1) पांथस्थ शब्दाचा अर्थ सांगा 
 1) प्रवासी  
2) प्रगत 
3) प्रघात 
4) प्रशिक्षित 
उत्तर -पांथस्थ या शब्दाचा अर्थ प्रवासी असा होतो 
2) खंक या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा 
1) धाडसी 
2) खेडूत 
3) खेटर 
4) द्रव्यहीन 
उत्तर - खंक या शब्दाचा समानार्थी शब्द द्रव्यहीन असा आहे 
3) तपाचरण या समासाचा योग्य विग्रह करा 
1) तपातून आचरण 
2) तपासाठी आचरण 
3) तपातील चरण 
4) तपातून चरण 
उत्तर -तपाचरण या समासाचा योग्य विग्रह तपासाठी आचरण असा आहे 
4) द्विरेफ शब्दाचा अर्थ सांगा 
1) द्रुत 
2) भेदभाव 
3) भ्रमर 
4) द्वीप 
उत्तर -द्विरेफ शब्दाचा अर्थ भ्रमर असा आहे  
5) उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक कोण आहेत ? 
1) सदानंद देशमुख 
2) सदानंद रेगे 
3) श्याम मनोहर 
4) विश्राम बेडेकर 
उत्तर -उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीचे लेखक श्री श्याम मनोहर हे आहेत 
श्याम मनोहर यांचे पूर्ण नाव श्याम मनोहर आफळे असे आहे 
श्याम मनोहर यांचे लेखन पुढील प्रमाणे आहे 
1) कळ 
2) उत्सुकतेने मी झोपलो 
3) शंभर मी 
त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरी 2008 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला 
6) वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कोणता ?
1) वृक्ष 
2) वासर 
3) विवंचना 
4) कावळा 
 उत्तर -वायस या शब्दाचा समानार्थी अचूक शब्द कावळा असा आहे 
कावळा या शब्दास पुढील समानार्थी शब्द आहेत 
1) वायस 
2) काक 
3) एकाक्ष 
7) अभ्यासाचे दप्तर जड या म्हणीचा अर्थ काय ? 
1) जास्त अभ्यास असणे 
2) दप्तरात पुस्तके जास्त 
3) जड व जाड पुस्तकांचा भरणा 
4) कामापेक्षा दगदगच फार 
उत्तर -अभ्यासाचे दप्तर जर या म्हणीचा अर्थ कामापेक्षा दगदगच फार असा होतो 
8) कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा 
1) मृत्यू होणे 
2) डोके फुटणे 
3) मोक्ष मिळवणे 
4) आदळणे 
उत्तर -कपाळमोक्ष होणे या वाक्प्रचाराचा मृत्यू होणे असा अचूक अर्थ आहे 
                                                   
                          तलाठी भरती मराठी

9) मृत्युंजय म्हणजे काय ? 
1) मृत्यू समोर आला आहे असा 
2) मृत्यूला घाबरलेला 
3) मृत्यू समोर हरलेला 
4) मृत्यूवर विजय मिळवणारा 
उत्तर -मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा 
10) पडघवली या कादंबरीचे लेखक कोण आहेत ? 
1) श्री . ज. जोशी 
2) श्री. म. माटे 
3) श्री. गो. नी. दांडेकर 
4) श्री. न. पेंडसे 
उत्तर -पडघवली या कादंबरीचे लेखक श्री गोपाळ निळकंठ दांडेकर हे आहेत  
11) खेद या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा 
 1) विशद 
 2) विषारी 
 3) विषाद 
 4) विषद 
उत्तर -खेद या शब्दाचा समानार्थी शब्द विषाद असा आहे  
                                    घटना दुरुस्ती
12) टिकास्वयंवर हा ग्रंथ कोणाचा आहे ? 
1) के. रं . शिरवाडकर 
2) राजन गवस 
3) भालचंद्र नेमाडे 
4) रंगनाथ पठारे 
उत्तर -टिकास्वयंवर हा ग्रंथ श्री भालचंद्र नेमाडे यांचा आहे 
13) ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ सांगा ? 
1) एकच ठिकाण असल्याने एकमेकांना ओळखून असणे 
2) बांधकामासाठी झाडांची तोडणी करणे 
3) सावलीसाठी झाडांची लागवड करणे 
4) शेतीसाठी काटेरी कुंपण बांधणे 
उत्तर -ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा अर्थ एकच ठिकाणी असल्याने एकमेकांना ओळखून असणे असा आहे 
14) जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा 
 1) वचन देणे 
2) सपाटून खाणे 
3) अतिशय भूक लागणे 
4) वाटेल तसे बोलणे 
उत्तर -जिभेला हाड नसणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ 
वाटेल तसे बोलणे असा होतो 
15) प्रत्यंचा शब्दाचा योग्य अर्थ सांगा 
1) समुद्रावरील प्रवास 
2) कपाळभर कुंकू 
3) धनुष्याची दोरी 
4) स्वसंरक्षण 
उत्तर -प्रत्यंचा या शब्दाचा योग्य अर्थ धनुष्याची दोरी असा आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu