मित्रांनो तलाठी भरती परीक्षेमध्ये 25 गुणांसाठी विचारल्या जाणाऱ्या मराठी मध्ये समानार्थी शब्द यावरती TCS चा कल जास्त आहे त्या मुळे सर्वांना परीक्षेसाठी उपयुक्त असणारे समानार्थी शब्द .
1) परिमळ - सुवास ,सुगंध
2) विवेचन - निरूपण
3) घर - निकेतन, सदन , आलय
4) पोपट - शुक
5) कुटुंब - बिऱ्हाड
6) घोडा - अश्व, तुरंग, वारू
7) शत्रु - वैरी,रिपु
8) दूध - क्षीर
9) अग्नी - अनल, पावक
10) साप - अही,सर्प
11) सुवर्ण - कांचन, कानन
12) निष्णात - तरबेज
13) कावळा - काक,एकाक्ष
14) कपाळ - ललाट, अलिक
15) देह - काया ,तनु,शरीर
16) हेम - सोने, कांचन, सुवर्ण
17) ताप - ज्वर
18) मगरमिठी - घट्ट पकड
19) प्रतिबिंब (PSI Mains ) - प्रतिमा
20) वारा (PSI Mains) - पवन,वायू, मारुत,समीर,वात,हवा,अनिल,
21) घोडा - तुरंग, वारू, हय,वाजी
22) ढग - नभ, घन, पयोधर
23) समुद्र - अर्नव, रत्नाकर
24) धनुष्य (PSI Mains ) - कोदंड , धनू
25) पर्वत ( PSI Mains ) - गिरी, शैल, अचल , अद्री
26) पत्नी ( PSI Mains ) - बायको, कांता, भार्या, कलत्र
27) कमळ ( PSI Mains ) - पद्म, सरोज, पंकज
28) उत्साह (STI Mains) - जोम, अभिनिवेश
29) पाणी ( PSI Mains ) - जल, अंबू,नीर, तोय, सलिल
30) मिठ - लवण
मागील वर्षीचे महत्त्वाचे प्रश्न
1) मंत्रणा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते ( क्लर्क - 2014)
- मंत्रना या शब्दाचे समानार्थी शब्द - सल्ला, चर्चा
2) आकाशवाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता ? ( अभियांत्रिकी सेवा 2011)
- आकाशवाणी ला नभोवाणी असे देखील म्हणतात
3) सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ( PSI Mains -2004)
- सूर्याला पुढील शब्द समांतर आहेत - दिवाकर, प्रभाकर
4) चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ( म्हाडा TCS - 2022)
- सुधाकर,शशी
5) अचेतन शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ( म्हाडा TCS -2022)
- चैतन्यरहित
6) स्पृहा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ( म्हाडा TCS -2022)
- इच्छा,अपेक्षा .