✶ ब्रिटिश काळात प्रामुख्याने पुढील 3 भसुधारणा पद्धती अस्तित्वात होत्या .
1) कायमधारा पद्धती
2) रयतवारी पद्धती
3) महालवारी पद्धती
1) कायमधारा पद्धती -
सुरुवात - 1793
ही पद्धत लॉर्ड कॉर्नवालीस ने सुरू केली
1789 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवालीस ने "जॉन शोअर"च्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली
याच समितीने 10 वर्षासाठी सुचवलेली ही योजना लॉर्ड कॉर्नवालीस ने 1793 मध्ये अमलात आणली
✧ वैशिष्ट्य -
या पद्धतीत जमिनीची मालकी" जमीनदाराकडे होती"
जमीनदार हे शेतकऱ्यांकडून कर गोळा करत असत व ब्रिटिशांना जमा करत असत
या पद्धतीमध्ये शेतकरी व ब्रिटिश यांचा थेट संबंध येत नव्हता
या पद्धतीत कराची रक्कम निश्चित होती .
٭ कोणत्या प्रांतामध्ये कायमधारा पद्धत लागू झालेली होती?
1) बंगाल
2) बिहार
3) बनारस
4) ओरिसा
5) कर्नाटकचा उत्तरेकडील भाग
⍟ कायमधारा पद्धतीचे दुष्परिणाम कोणते ?
या जमीन महसुली पद्धतीमुळे शेतकऱ्यांची खूप पिळवणूक झाली
कर वेळेवर देण्यासाठी शेतकरी सावकारांकडून कर्ज काढू लागले
जमीनदार हे आता शेतकऱ्यांच्या जमिनीचे मालक झाले होते
2) रयतवारी पद्धती -
सुरुवात - 1820
रयतवारी पद्धतीची सुरुवात कोणी केली ?
- रयतवारी पद्धतीची सुरुवात Thomas Munro आणि Alexander Reed यांनी केली
रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू होती ?
1) मद्रास
2) मुंबई
3) आसाम
रयतवारी पद्धतीची वैशिष्ट्ये-
कामधारा पद्धतीमध्ये असणाऱ्या सर्व उणीवा दूर करण्यासाठी ब्रिटिशांनी ही पद्धत सुरू केली
या पद्धतीत जमिनीची मालकी " शेतकऱ्यांकडेच होती"
या पद्धतीत "ब्रिटिश अधिकारी" हे "थेट शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करत असत"
या पद्धतीत जमिनीची मोजमापन केले जाईल व त्या जमिनीच्या प्रतीप्रमाणे तिचे वर्गीकरण करून त्यानुसार महसूल ठरवला जात असे
रयतवारी पद्धत किती वर्षासाठी होती ?
ही पद्धत 30 वर्षे राहणार होती .
रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना कोणते अधिकार होते ?
शेतकरी जमीन गहाण ठेवू शकत होते .
शेतकरी जमीन विकू शकत होते
शेतकरी जमीन किरायाने देऊ शकत होते
शेतकरी जमिनीचे हस्तांतरण करू शकत होते
⭑ रयतवारी पद्धतीमध्ये शेतकरी आणि ब्रिटिश यांच्या थेट संबंध येत होता यात जमीनदाराचा कसलाही समावेश नव्हता .
★ महाराष्ट्र मधील रयतवारी पद्धती -
1823 मध्ये पुणे येथे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची Assistant Revenue Collector म्हणून नियुक्ती झाली ?
1823 मध्ये " प्रिंगेल" या ब्रिटिश अधिकाऱ्याची पुण्यामध्ये Assistant Revenue Collector म्हणून नियुक्ती झाली
त्यांनी 1824 ते 1828 या कालावधी मध्ये जमिनीचे सर्वेक्षण केले .
रयतवारी पद्धती चे दुष्परिणाम कोणते ?
या पद्धतीमुळे जमीन गहाण टाकने, जमीन विकणे इत्यादी समस्या समोर आल्या .
या पद्धतीमुळे जमिनीचे विभाजन झाले .
✸ मौजेवारी पद्धती -
मोजेवारी पद्धत कोणी सुरू केली ?
मोजेवारी पद्धत ही माउंट एल्फिन्स्टन यांनी सुरू केली .
3) महालवारी पद्धत -
सुरुवात - 1822
महालवारी पद्धत कोणाच्या शिफारशीवरून सुरू झाली ?
महालवारी पद्धत ही Volt Mackenzie यांच्या शिफरशीनुसार सुरू झाली.
* महालवारी पद्धत कोठे अमलात आली होती ?
उत्तरप्रदेश ( तत्कालीन संयुक्त प्रांत)
आग्रा
अवध
पंजाब
* महालवारी पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती ?
या पद्धतीनुसार भूमिकर हा शेतकऱ्यापासून नाही तर संपूर्ण गावापासून किंवा महालापासून ठरविल्याप्रमाणे घेतला जात होता
भूमीवर संपूर्ण कामाचा एकत्रित अधिकार होता त्याला हिस्स्यदारांचा समूह असे म्हणत
या पद्धतीमध्ये कर वसुलीचे काम " लंबरदार" यांच्याकडे देण्यात आले होते .