Plant Classification ( वनस्पती वर्गीकरण)
Eicheler या वनस्पती शास्त्रज्ञाने 1883 Kingdom Plantae चे वर्गीकरण पुढील दोन उपसृष्टीमध्ये केले
1)अबिजपत्री ( Cryptogams )
2)बिजपत्री (Phanerogams)
Cryptogams (अबिजपत्री) - यांचे पुढील तीन विभागांमध्ये वर्गीकरण केले जाते
विभाग 1 - Thallophyta ( थॅलोफायटा) - या विभागातील वनस्पती मुख्यतः पाण्यात वाढतात
- या वनस्पतींना मूळ खोड पान फुलं ही अवयव नसतात
- या वनस्पतीमध्ये हरितद्रव्य असते यामुळे या वनस्पती स्वयंपोषी असतात
- या गटात मुख्यतः शैवाळ समावेश होतो
- उदा. स्पायरोगायरा, उल्वा, सरगॅसम, Ulothrix, .Chlaymydomonas
- थॅलोफायटा याच गटात हरितद्रव्य नसणाऱ्या किन्व( Yeast) आणि बुरशी यांचा समावेश होतो
- Chlaymydomonas हे एकपेशी असतात
- Volvox हे कॉलनीच्या स्वरूपात असतात
- Ulothrix, आणि स्पायरोगायरा हे धाग्याच्या स्वरूपात असतात .
- Green Algae - Chlaymydomonas, Volvox, Ulothrix, Chara
Brown Algae- Ectocarpus, Dictyota, Laeminaria, Sargassum, Fucus.
Red Algae - Pokysiphonia, Porphyra, Gracilaria, Gelidium.
Uses of algae -
अन्न म्हणून उपयोग- Porphyra, Ulva, Surgassum, Laeminaria,
आयोडीन निर्मिती मध्ये उपयोग- Laeminaria , Fucus, Echlonia,
खत म्हणून उपयोग - Nostoc, Anabana , Kelp
औषध निर्मिती मध्ये उपयोग- Chloreloline हे घटक Chlorella पासून मिळते and
Tincher Iodine ही from Laminaria पासून मिळते
--Spirogyra या वनस्पतीला ‘ Pond Silk” असेही म्हणतात
विभाग 2 - ब्रायोफायटा ( Bryophytes) - या वनस्पती बहुपेशीय आणि स्वयंपोषी असतात
-या वनस्पतींच्या शरीराची रचना ही चपटी रिबिन सारखी लांब असते
-या वनस्पतीमध्ये खरी मुळे, पान, खोड नसतात तर त्यांच्या ऐवजी त्यांच्या सारखीच असणारी पाना सारखी रचना असते, या वनस्पती मध्ये मूळ ऐवजी मूलाभ असतात
-या वनस्पतीमध्ये अन्न आणि पाणी यांच्या वहनासाठी विशिष्ट उती नसतात
-या वनस्पतींना वाढीसाठी ओलसर मातीची आवश्यकता असते परंतु या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते त्यामुळे या वनस्पती ओलसर माती आणि पाणी या दोन्ही ठिकाणी वाढतात म्हणून या वनस्पतींना “वनस्पती सृष्टीचे उभयचर” असे म्हटले जाते
-उदा. रिक्सिया, मर्केशिया, Moss( Funaria), Anthoceros,
-Sphagnum - ही वनस्पती तिच्या वजनाच्या 18 पटी ने जास्त पाणी शोषून घेते त्या मुळे तिला गार्डन मध्ये उपयोगात आणले जाते ,
-Sphagnum ही वनस्पती इंधन म्हणून सुद्धा वापरली जाते
-Sphagnum ही वनस्पती जंतुनाशक म्हणून सुद्धा
विभाग 3 - टेरिडोफायटा ( Pteridophyta)
- या वनस्पतीत पुढील अवयव असतात - पान, मूळ, खोड,
- या वनस्पतीमध्ये जलवाहिनी आणि अन्न वाहिनी देखील असतात
- परंतु या वनस्पतींना फुल आणि फळे येत नाहीत .
- या वनस्पतींच्या पानाच्या पाठीमागे असलेल्या बिजाणूंच्याद्वारे या वनस्पतीमध्ये प्रजनन होते
- उदा. - Nephrolepis, Marsilea, Pteris, Adiantum, Equisetum, Selaginella, Lycopodium.
उपसृष्टी- बीजपत्री ( Phanerogams) -
ज्या वनस्पतींमध्ये बिया तयार होतात आणि त्या वनस्पतींचे प्रजनन बिया मार्फत होते अशा वनस्पतींना बीजपत्री वनस्पती असे म्हणतात.
बियाच्या स्थितीवरून या वनस्पतींचे दोन उपप्रकार पडतात
1) अनावृत्त बीजी वनस्पती ( Gymnosperm)
2) आवृतबीजी वनस्पती ( Angiosperm)
1)अनावृत्त बीजी वनस्पती ( Gymnosperm) -
- या गटातील वनस्पती मुख्यतः सदाहरित असतात
- या गटातील वनस्पती बहुवार्षिक आणि काश्ठमय असतात
- या वनस्पतीमध्ये खोडा वरती फांद्या नसतात
- या गटातील वनस्पतीमध्ये पानांचा मुकुट तयार झालेला असतो
- या गटातील वनस्पतींमध्ये नर आणि मादी फुले एकाच झाडावरती वेगवेगळ्या Sporophylls (बिजानुपत्रे) वर येतात
- या गटातील वनस्पतींच्या बियावरती नैसर्गिक आवरण नसते याचाच अर्थ या गटातील वनस्पतींना फळे येत नाहीत
- यांची बिया उघड्या असतात म्हणून यांना अनावृत्तबीजी वनस्पती असे म्हणतात
- उदा. सायकास, मोरपंखी( थुजा), देवदार, क्रिसमस ट्री
- या गटातील वनस्पतीमध्ये परागीभवन हवे मार्फत होते
- Zaima Pygmia ही या गटातील सर्वात छोटी वनस्पती आहे
- Sequoia Gigentia ही या गटातील सर्वात उंच वनस्पती आहे
2) आवृतबीजी वनस्पती ( Angiosperm)
- या गटातील वनस्पतींना फळे येतात व त्या फळांमध्ये बिया असतात
- या वनस्पतीतील बिया फळाच्या आत असल्याने या वनस्पतींना आवृत्तबीजी वनस्पती असे म्हणतात .