द बॉम्बे असोसिएशन -
स्थापना- 26 ऑगस्ट 1852
ठिकाण - मुंबई
उद्दिष्टे -
जनतेच्या कल्याणासाठी आवश्यकते सर्व उपाय सरकारला कळविणे
भारतीयांची सर्व दुःख यातना सरकारच्या नजरेत आणून देणे
महत्व - ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती
या घटनेच्या स्थापनेसाठी दादाभाई नौरोजी आणि नाना शंकर शेठ यांचे खूप मोठे योगदान होते .
स्वरूप -
अध्यक्ष - नाना शंकर शेठ
सरचिटणीस - डॉक्टर भाऊ दाजी लाड
इतर सदस्य- विनायक जगन्नाथ, जमशेदजी जिजिभाई.
या संघटनेने पुढील कार्य केले -
डॉक्टर भाऊ दाजी लाड यांनी ब्रिटिश संसदेला एक निवेदन सादर केले ज्यामध्ये कंपनीने भारतामध्ये जो अन्याय कारभार चालवला आहे यावर भर दिला
या निवेदनावर महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई पुणे या ठिकाणांमधून हजारो लोकांनी सह्या केल्या .
या संघटनेने भारतीय लोकांना कायदेमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केले.
1861 मध्ये मुंबई इलाका कायदेमंडळात बॉम्बे असोसिएशनचे अध्यक्ष नाना शंकर शेठ हे पहिले सदस्य बनले .