तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका - 2023 Talathi bharti Previous Year paper 2023

तलाठी भरती मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका 2023

 तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका - 2023 

विद्यार्थी मित्रांनो 2023 मध्ये झालेल्या तलाठी भरती परीक्षांमध्ये विचारले गेलेल्या सामान्य ज्ञान या विषयासंबंधित प्रश्न आपल्या तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका 2023 मध्ये दिलेली आहेत  हे प्रश्न येणारी तलाठी भरती तसेच महिला बालविकास विभाग भारती, समाजकल्याण विभाग भरती,  नगर परिषदभरती,  नगर पंचायत भरती,  वित्त व लेखा कोषागार विभाग भरती,महानगरपालिका भरती तसेच इतर सरळसेवा परीक्षा यांना उपयुक्त ठरणार आहे . 

तलाठी भरती मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका - 2023 

1) खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टम नाही ? 
 1) WINDOWS ( विंडोज) 
 2) POWERPOINT  ( पॉवरपॉईंट ) 
 3) MACINTOSH ( मॅकिंतोश ) 
 4) LINUX ( लिनक्स ) 
 उत्तर  -   2) POWERPOINT ( पॉवरपॉईंट )  ही एक ऑपरेटिंग सिस्टम नाही 
 काही महत्वाच्या ऑपरेटिंग सिस्टम 
  1) विंडोज 
  2) लिनक्स 
  3) मॅकिन्तोश  
  4) macOS
 
2) महात्मा फुले यांनी ....... मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली 
  1) 1879   
  2) 1873 
  3) 1864 
  4) 1885 
 उत्तर  - 2) 1873  
 महात्मा फुले यांनी 24 सप्टेबर 873 रोजी पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली  
 महात्मा फुले यांच्यावर  थॉमस पेन यांच्या द राइट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव होता  
दीनबंधु हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते 
नारायण मेघाजी लोखंडे हे दीनबंधु चे संपादक होते  

3) .... मध्ये, सरदार वल्लभ भाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले

 1) 1926

 2) 1924

 3) 1928

 4) 1922

उत्तर - 1928 मध्ये सरदार वल्लभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले

4) ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहचल्यावर तिला ... या नावाने ओळखले जाते

  1) यमुना

  2) त्सांग पो

  3) दिहांग

  4) मेघना

 उत्तर - ब्रह्मपुत्रा नदी जेव्हा अरुणाचल प्रदेशात पोहचते तेव्हा तिला दिहांग असे म्हणतात

 मेघना - ही नदी बांगलादेश मध्ये आहे

5) स्वामी दयानंद सरस्वती यांच्या बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे

1) त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केली

2) ते विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होते

  1) फक्त 1

  2) फक्त 2

  3) 1 किंवा 2 पैकी एकही नाही

  4) 1 आणि 2 दोन्ही

उत्तर - 1  फक्त 1 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापना केली

आर्य समाज - स्थापना - 10 एप्रिल 1875     ठिकाण - मुंबई

6) भारतीय राज्यघटनेतील खालील पैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदींच्या संदर्भात आहे 

1) अनुच्छेद 6 

2) अनुच्छेद 5

3) अनुच्छेद 7 

4) अनुच्छेद 8 

उत्तर - अनुच्छेद 5 


7) 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आले ? 

1) राजस्थान 

2) मध्यप्रदेश 

3) महाराष्ट्र 

4) हरियाणा 

उत्तर - पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स 2022 च्या आयोजन मध्य प्रदेश या राज्यात करण्यात आले 

1 - दिल्ली

2) महाराष्ट्र 

3) आसाम

4) हरियाणा 

5) मध्यप्रदेश 


8) केंद्रीय माहिती आयुक्त यांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात 

1) भारताचे सरन्यायाधीश 

2) लोकसभेचे अध्यक्ष 

3) भारताचे राष्ट्रपती 

4) पंतप्रधान 

उत्तर - पंतप्रधान 


9) 1919 मध्ये महात्मा गांधीजींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला ? 

1) गुन्हेगारी जमाती कायदा 

2) पीट्स इंडिया कायदा 

3) सायमन कमिशन 

4) रौलट  कायदा 

उत्तर -

रौलट  कायदा - 1919  

ब्रिटिश सरकारने 1917 मध्ये सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली पुढे रौलट यांच्या नावामुळे या रौलट  कायदा हे नाव पडले 

याच कायद्याला काळा कायदा असे देखील म्हणतात  

https://www.mpsc4sure.in/2025/05/talathi%20bharati-marathi.html

10) संगणाकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट ( Refresh Rate ) काय आहे ? 

1) 20 HZ

2) 40 HZ

3) 60 HZ

4) 200 HZ

उत्तर - 60 HZ 

संगणकाच्या डिस्प्लेचा सामान्य रिफ्रेश रेट हा 60 HZ इतका असतो 

11) खालीलपैकी कोणती माहिती भारताच्या माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्रकटीकरणातून

 ( Disclosure)  वगळलेली नाही  

1) भारताच्या सार्वभौमत्वावर आणि एकात्मतेवर बाधक परिणाम करणारी  माहिती

2) राज्याच्या वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधावर बाधक परिणाम करणारी माहिती

3) संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग करणारी माहिती 

4) संबंधित अधिकार्‍याला सामायिक करण्यात रस नसलेली माहिती 

उत्तर -  संबंधित अधिकार्‍याला सामायिक करण्यात रस नसलेली माहिती  

तलाठी भरती सामान्य ज्ञान


12 ) कोणत्या शहराणे प्रतिष्ठित  जागतिक हरित शहर पुरस्कार ( World Green Cities Award ) 2022 जिंकला ? 

1) कोलकाता

2) मुंबई

3) हैदराबाद

4) चेन्नई

उत्तर - हैदराबाद  


13) मेरीस्टेम हि सज्ञा देण्याचे श्रेय कोणत्या व्यक्तीला दिले जाते ? 

1) ओसवाल्ड एव्हरी 

2) फ्रान्सिस कॉलिन्स

3) नागेली

4) आंद्रेयस वेसलियस 

उत्तर -  नागेली यांनी Meristem हि  टर्म दिली 

14) खालीलपैकी कोणी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहली आहे ? 

1) प्रबोधनकार ठाकरे

2) दादोबा पांडुरंग

3) वसंत राव

4) शंकर खेडकर 

उत्तर - प्रबोधनकार ठाकरे 


15) 1836 मध्ये स्थापन झालेल्या बंगभाषा प्रकाशिका सभेशी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा संबंध नव्हता ? 

1) द्वारकानाथ टागोर

2) आत्माराम पांडुरंग

3) प्रसन्नकुमार ठाकुर

4) कालिनाथ चौधरी

उत्तर - आत्माराम पांडुरंग हे बंगभाषा प्रकाशिका सभेशी संबधित नव्हते 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu