तलाठी भरती सामान्य ज्ञान - 2024 गतवर्षाच्या प्रश्नपत्रिका talathi bharati previous year GS Question

        विद्यार्थी मित्रांनो आपल्या MPSC 4 SURE या वेबसाईटवर आपण महिला व बाल विकास, अंगणवाडी मुख्य सेविका, तलाठी भरती, नगरपरिषद, जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहोत.                                                            
तलाठी भरती

1) केंद्रीय माहिती आयुक्त यांच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोण कार्य करतात ? 
 1) भारताचे सरन्यायाधीश 
 2) लोकसभेचे अध्यक्ष 
3) भारताचे राष्ट्रपती 
4) पंतप्रधान 
उत्तर -  पंतप्रधान
केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये झालेली आहे 
केंद्रीय माहिती आयोगाचे सुरू पुढील प्रमाणे आहे 
 केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त असतात 
केंद्रीय माहिती आयोगामध्ये  10 पेक्षा जास्त माहिती आयुक्त नसतात 
यांची निवड राष्ट्रपती यांच्यामार्फत केली जाते , आयुक्तांच्या निवडीसाठी एक समिती काम करते या समितीमध्ये पुढील  समावेश होतो 
1) पंतप्रधान - अध्यक्ष 
2) लोकसभेतील विरोधी पक्षनेता 
4) पंतप्रधानांनी नामांकित केलेले केंद्रीय कॅबिनेट मंत्री 
2) 1919 मध्ये महात्मा गांधींनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिनियमाच्या विरोधात देशव्यापी सत्याग्रह सुरू केला ? 
1) गुन्हेगारी जमाती कायदा 
2) पिट्स इंडिया कायदा 
3) सायमन कमिशन 
4) रौलट कायदा 
उत्तर - रौलट कायदा
  ब्रिटिश सरकारने सर सिडने रौलट च्या अध्यक्षतेखाली Sedition Committee ( देशद्रोह समिती ) 1917 स्थापन केली 
या समितीचे शिफारशीनुसारच पुढील दोन विधेयके सादर झाली 
1)  खटल्याविना कारावासाबद्दलचे विधेयक 
2) सभाबंदीचे विधेयक 
3) मूलभूत कर्तव्यांची संकल्पना ...... कडून करून घेण्यात आली आहे 
  1) जर्मनी 
  2) चीन 
  3) दक्षिण आफ्रिका 
  4) यु एस एस आर ( USSR) 
उत्तर - मूलभूत  कर्तव्यांची  संकल्पना    यु एस एस आर ( USSR) देशाकडून देण्यात आली
         
     वैशिष्ट्ये 
1) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 - 
न्यायव्यवस्था, संघराज्य योजना, लोकसेवा आयोग, आणीबाणी तरतुदी, प्रशासकीय तपशील, राज्यपाल पद
2) ब्रिटिश घटना - 
कॅग चे कार्यालय, First Past the Post System, एकेरी नागरिकत्व, संसदीय शासन व्यवस्था, द्विग्रही संसद, कॅबिनेट पद्धत, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, संसदीय विशेष अधिकार .
3) कॅनडा 
राष्ट्रपती द्वारे राज्यपालांची नेमणूक, केंद्र प्रभावी असलेले संघराज्य, शेष अधिकार केंद्राकडे असणे, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधि क्षेत्र , राज्य सूची आणि केंद्र सूची 
4) अमेरिका - 
मूलभूत हक्क, उद्देश पत्रिका, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, Judicial Review , राष्ट्रपतींचा महाभियोग, उपराष्ट्रपतींचे पद, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत, राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती यांची कार्य .
5)आयर्लंड - 
राज्यसभेमध्ये बारा व्यक्तींच्या नियुक्ती , मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतींचे निर्वाचन मंडळ 
6) ऑस्ट्रेलिया - 
दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक , देशामध्ये व्यापार आणि वाणिज्य स्वातंत्र्य , समवर्ती सूची 
7) रशिया  - 
प्रस्ताविका यामधील सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय, मूलभूत कर्तव्य 
8) दक्षिण आफ्रिका -
राज्यसभेमध्ये सदस्यांची निवडणुकीची पद्धत, घटना दुरुस्तीची पद्धती 
9) जर्मनी - 
आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित 
10) जपान - 
कायद्याने प्रस्थापित पद्धत
11) फ्रान्स - 
प्रस्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता व बंधुता , गणराज्य 
4) महात्मा ज्योतिबा फुले यांनी ..... मध्ये सत्यशोध समाजाची स्थापना केली 
1) 1879    2) 1873   3) 1864   4) 1885 
उत्तर - महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली 
महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली 
5) खालीलपैकी कोण  डिप्रेस्ड क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते ? 
1) मृणाल पाटणेकर 
2) जी.एम.पवार 
3) विठ्ठल रामजी शिंदे 
4) नानाजी देशमुख 
उत्तर - विठ्ठल रामजी शिंदे 
महर्षी शिंदे शिंदे यांनी ऑक्टोबर 1906  मुंबईमध्ये डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली
6) भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा यापैकी कोणती आहे ? 
1) आग्नेय कडून नैऋत्यकडे 
2) ईशान्य कडून नैऋत्य कडे 
3) वायव्य कडून ईशान्येकडे 
4) नैऋत्य कडून ईशान्येकडे 
उत्तर- भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा ही नैऋत्य कडून ईशान्य कडे आहे 
7) भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात नोंदवली गेली ? 
1) महाराष्ट्र 
2) पश्चिम बंगाल 
3) हिमाचल प्रदेश 
4) उत्तर प्रदेश 
उत्तर - भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार सर्वात कमी शहरी लोकसंख्या हिमाचल प्रदेश या राज्यात नोंदवली गेली आहे  
8) 1919 च्या जलियान वाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी खालीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली होती 
1) बटलर कमिटी 
2) हंटर कमिटी 
3) फ्रेजर कमिटी 
4) मुडीमन कमिटी 
उत्तर- 1919 च्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी हंटर कमिटीची स्थापना करण्यात आली 
14 ऑक्टोबर 1919 मध्ये लॉर्ड विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिटीची स्थापना करण्यात आली 
                                                                        
तलाठी भरती सामान्य ज्ञान

9) गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 साली  खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती ? 
1) बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 
2) धर्मसभा 
3) भारत सेवक समाज 
4) परमहंस मंडळी 
उत्तर  - श्री गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली 
10) DBT चे पूर्ण रूप काय आहे 
1) डायरेक्ट बँक ट्रान्सफर (Direct Bank Transfer) 
2) डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ( Direct Benefit Transfer) 
3) डायरेक्ट बिजनेस ट्रान्सफर ( Direct Business Transfer) 
4) डायरेक्ट अँड ब्लाइंड ट्रान्सफर ( Direct & Blind Transfer) 
उत्तर - DBT चे पूर्ण रूप हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असे आहे 
DBT - Direct Benefit Transfer 
11) 1817 चा खुर्दा उठाव सध्याच्या कोणत्या भारतीय राज्यात झाला होता ? 
1) ओडिशा 
2) कर्नाटक 
3) महाराष्ट्र 
4) उत्तर प्रदेश 
उत्तर - 1857 चा खुर्द उठाव सध्याच्या ओडिसा या राज्यात झालेला होता 
12) 18 व्या शतकात इंग्रज आणि म्हैसूरचे राज्यकर्ते यांच्या दरम्यान किती लढाया झाल्या  
1) 2 
2) 1 
3) 4 
4) 3
उत्तर  - 18 व्या शतकात इंग्रज आणि म्हैसूरचे राज्यकर्ते यांच्या दरम्यान 3 लढाया झाल्या 
13) जोग धबधब्यासाठी कोणती नदी ओळखली जाते ? 
1) तुंगभद्रा नदी 
2) कृष्णा नदी 
3) महानदी 
4) शरावती नदी 
उत्तर-  जोग हा धबधबा कर्नाटक मध्ये शरावती नदी वरती स्थित आहे 
14) अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते ? 
1) कृष्णा 
2) गोदावरी 
3) नर्मदा 
4) गंगा 
उत्तर - अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांच्या संगमामुळे भारतातील सर्वात प्रमुख नदी गंगा  हीची निर्मिती होते 
15) भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर... आहे 
1) वुलर तलाव 
2) चिल्का तलाव 
3) दल सरोवर 
4) लोकटक तलाव 
उत्तर - भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर हे चिल्का तलाव आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu