तलाठी भरती - 2025 - मराठी व्याकरण 2024 प्रश्नपत्रिका भाग - 1

   विद्यार्थी मित्रांनो आपल्या MPSC4 SURE या वेबसाईट वरती आपण  महाराष्ट्र शासनाच्या विविध पदांच्या भरतीसाठी लागणारे सर्व विषयांचे मराठी, इंग्रजी , इतिहास, भूगोल, विज्ञान या सर्व विषयांचे महत्त्वाचे प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेले आहेत.   
                                                तलाठी भरती

2024 मध्ये झालेल्या सर्व तलाठी भरती पदासाठीची आलेले गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका प्रश्नसंच स्वरूपात सादर केलेले आहेत
तलाठी भरती - 2025 - मराठी व्याकरण 2024 प्रश्नपत्रिका  मधील मराठी व्याकरण  प्रश्नसंच

1) मुक्ताफळे म्हणजे काय ? 
     1) हास्यास्पद बोलणे 
     2) मोकळा 
    3) कर्मफळ 
    4) एक प्रकारचे फळ 
उत्तर -मुक्ताफळे म्हणजे हास्यास्पद बोलणे  
2) "लष्कर" या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ? 
1) बंड 2) कोरडा 3) फेर 4) सैन्य 
उत्तर - लष्कर या शब्दाचा समानार्थी शब्द सैन्य असा आहे 
3) अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? 
1) निष्कर्ष 2) उत्कर्ष 3) समर्थ 4) विमर्श 
उत्तर - अपकर्ष शब्दाचा विरुद्धार्थी शब्द उत्कर्ष असा होतो 
4) पुढीलपैकी कोणती कादंबरी ही श्री जयवंत दळवी यांनी लिहिलेली आहे ? 
1) सारे प्रवासी घडीचे
 2) दुर्दम्य  
 3) गोतावळा
 4) चक्र 
उत्तर - चक्र ही कादंबरी श्री जयवंत दळवी यांनी लिहिलेली आहे
जयंत दळवी - जयंत दळवी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य साहित्यिक होते 
ते मुळ सिंधुदुर्ग येथील होतो त्यांच्या पुढील कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत 
     1) कवडसे 
     2) प्रदक्षिणा 
     3) महानंदा 
     4) अभिनेता 
     5) अधांतरी 
     6) चक्र   
5) आजन्म, यथाशक्ती, प्रतिक्षन . हे शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ? 
 1) द्वंद्व समास
 2) तत्पुरुष
 3) अव्ययीभाव
 4) बहुव्रीही 
उत्तर-  आजन्म, यथाशक्ती, प्रतिक्षन हे शब्द अव्ययीभाव समासाचे उदाहरण आहेत 
अव्ययीभाव समास यामध्ये या समासातील पहिले पद हे मुख्यतः अव्यय असते आणि ते महत्त्वाचे असते तसेच या सामासिक शब्दाचा वापर मुख्यतः क्रियाविशेषणाप्रमाणे केला जातो 
                     
                                 तलाठी भरती

6) उत्कर्ष या शब्दाच्या विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून बनवलेले अचूक वाक्य खालीलपैकी कोणती आहे ? 
1) अलीकडे भारताने खूप प्रगती केली आहे 
2) प्राची नेहमी सुसंग बोलते 
3) संगणकाच्या क्रांतीने रोजगार बुडाला 
4) एकेकाळी श्रीमंत असणाऱ्या धर्मेंद्रचा जुगारीमुळे अपकर्ष झाला होता 
उत्तर- उत्कर्ष शब्दाच्या विरुद्ध अर्थ अपकर्ष असा होतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर एकेकाळी श्रीमंत असणाऱ्या धर्मेंद्रचा जुगारीमुळे अपकर्ष झाला होता हे आहे . 
7) आलोक कथासंग्रह कोणाचा आहे ? 
   1) आसाराम लोमटे 2) आशा बगे 3) अनुराधा पाटील 4) जयंत पवार 
उत्तर -आलोक कथा संग्रह श्री आसाराम लोमटे यांचा आहे 
आसाराम लोमटे हे मराठी साहित्यिक आहेत त्यांनी पुढील साहित्य लिहिलेले आहे 
    1) इडा पीडा टळो 
    2) धूळपेर 
    3) आलोक 
आलोक या लघुकथा संग्रहास 2016 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे 
8) गंगाजळी म्हणजे ......
1) शिल्लक रक्कम  
2) मोठी रक्कम 
3) दुर्मिळ योग 
4) गंगाजळ 
उत्तर -गंगाजळी म्हणजे शिल्लक रक्कम 
9) तराळ अंतराळ हे कोणाचे आत्मकथन आहे ? 
   1) शरण कुमार लिंबाळे 
   2) दया पवार 
   3) श्री. म. माटे
   4) शंकरराव खरात 
उत्तर -तराळ अंतराळ हे आत्मकथन श्री शंकरराव खरात यांचे आहे 
10) एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिले ? 
 1) विलास पाटील
 2) गंगाधर गाडगीळ
 3) रंगनाथ पठारे 
 4) वि. स. खांडेकर 
उत्तर -एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक श्री गंगाधर गाडगीळ यांनी लिहिले 
 11) मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कोणी लिहिली ? 
 1) रवींद्र ठाकूर
 2) कविता मुरूमकर
 3) गजमल माळी.
 4) धनंजय कीर  
उत्तर- मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी कविता मुरूमकर यांनी लिहिली 
12) तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? 
  1) विजय तेंडुलकर  
  2) वि. वा. शिरवाडकर  
  3) डॉ. नरेंद्र दाभोळकर 
  4) अनिल अवचट 
उत्तर - तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक श्री डॉ. नरेंद्र दाभोळकर हे आहेत . 
13) खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा  
    निपुण 
  1) निबीड 2) कुशल 3) निश्चय 4) निरभ्र  
उत्तर -निपुण या शब्दाचा योग्य अर्थ कुशल असा आहे 
14) शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले ? 
  1) श्री शिवाजी सावंत    
  2) श्री बाबासाहेब पुरंदरे 
  3) श्री ना. स. इनामदार 
  4) श्री वसंत कानेटकर 
उत्तर- शिवशाहीचा शोध हे पुस्तक श्री वसंत कानेटकर यांनी लिहिले 
15) झाडाझडती ही कादंबरी कोणी लिहिली ? 
   1) श्री विश्वास नांगरे पाटील
   2) श्री विश्राम बेडेकर 
   3) श्री विश्वास पाटील 
   4) श्री मुकुंद पाटील 
उत्तर- झाडाझडती ही कादंबरी श्री विश्वास पाटील यांनी लिहिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Close Menu