विद्यार्थी मित्रांनो आपल्या MPSC 4 SURE या वेबसाईटवर आपण महिला व बाल विकास, अंगणवाडी मुख्य सेविका, तलाठी भरती, नगरपरिषद, जिल्हा परिषद भरती संदर्भात महत्त्वाचे प्रश्नसंच उपलब्ध करून देत आहोत.
1) वानर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
1) पवन
2) सारंग
3) हंस
4) शाखामृग
उत्तर -वानर या शब्दाचा समानार्थी शब्द शाखामृग असा आहे
2) पुढीलपैकी मध्यमपदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ?
1) प्रतिदिन
2) आईबाप
3) महादेव
4) बालमित्र
उत्तर -बालमित्र हे मध्यमपदलोपी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे
3) पुढीलपैकी रानवाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) मारुती चितमपल्ली
2) प्र. के. अत्रे
3) बालकवी
4) वी. स. खांडेकर
उत्तर -रानवाटा या पुस्तकाचे लेखक श्री मारुती चितमपल्ली हे आहेत
4) मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा
1) समापन कर्मणी
2) भावे प्रयोग
3) अकतुर्क प्रयोग
4) कर्तरी प्रयोग
उत्तर -मीनाचा निबंध लिहून झाला या वाक्यात समापन कर्मणी हा प्रयोग आहे
5) कोसला पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
1) राजन गवस
2) भालचंद्र नेमाडे
3) अनिल अवचट
4) दुर्गा भागवत
उत्तर -कोसला या पुस्तकाचे लेखक श्री भालचंद्र नेमाडे हे आहेत
6) पुढीलपैकी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे ?
1) गीतांजली
2) ग्रामगीता
3) अमृतानुभव
4) विवेक सिंधू
उत्तर -राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आहे .
7) तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
1) पयोधर
2) तरु
3) खड्ग
4) तिरकमठा
उत्तर -तलवार या शब्दाचा समानार्थी शब्द खड्ग असा आहे
8) खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा
अप्पलपोटा
1) दुसऱ्याचे हित चिंतनारा
2) सफरचंद आवडणारा
3) स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा
4) खाण्याची आवड असणारा
उत्तर -अप्पलपोटा या शब्दाचा योग्य अर्थ स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा असा होतो .
9) खालील शब्दाचा अर्थ ओळखा
सुमन
1) बगीचा
2) पुष्प
3) उपवन
4) वनिता
उत्तर -सुमन या शब्दाचा अर्थ पुष्प असा होतो
10) माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचे आत्मकथन आहे ?
1) कुसुमावती देशपांडे
2) इरावती कर्वे
3) दुर्गा भागवत
4) गोदावरी परुळेकर
उत्तर -माणूस जेव्हा जागा होतो हे गोदावरी परुळेकर यांचे आत्मकथन आहे
11) बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली ?
1) विलास पाटील
2) रंगनाथ पठारे
3) शिवाजी सावंत
4) त्र्यं. वी . सरदेशमुख
उत्तर -बखर एका राजाची ही कादंबरी श्री त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांनी लिहिली
12) खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा
गोगलगाय अन पोटात पाय
1) वरून गरीब दिसणारा आतून शांत असतो
2) वरून गरीब दिसणारा आतून दयाळू असतो
3) वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो
4) वरून गरीब दिसणारा आतून प्रेमळ असतो
उत्तर -गोगलगाय अन पोटात पाय या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ वरून गरीब दिसणारा आतून कपटी असतो असा होतो.
13) खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा
टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही
1) खूप कष्ट सोसावेत तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते
2) आत एक बाहेर एक
3) चांगली गोष्ट ताबडतोब करावी
4) स्वतः आचरण न करता दुसऱ्याला उपदेश करणे
उत्तर -टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही या म्हणीचा अर्थ खूप कष्ट सोसावे तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते असा होतो
14) खालील शब्दाचा समास ओळखा
पंचपाळे
1) तत्पुरुष समास
2) बहुव्रीह समास
3) द्विगु समास
4) अव्ययीभाव समास
उत्तर -पंचपाळे या शब्दाचा समास हा द्विगु समास आहे
15) खालील शब्दाचा समास ओळखा
मीठभाकर
1) अव्ययीभाव समास
2) तत्पुरुष समास
3) द्विगु समास
4) द्वंद्व समास
उत्तर -मीठभाकर या शब्दाचा समास हा द्विगु समास आहे
0 टिप्पण्या