पहिली पंचवार्षिक योजना -1951-1956
कालावधी - 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956
अध्यक्ष - पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष - गुलझारीलाल नंदा
पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये Harrod - Domar ( हेरॉड - डोमर) हे प्रतिमान वापरले होते .
पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर हा कृषी वर होता
उद्दिष्ट - पहिला योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती
1) राष्ट्रीय उत्पन्नामध्ये 2.1 % वृद्धी साधने
2) कृषी क्षेत्राचा विकास करणे
3) चलनवाढ नियंत्रित ठेवणे
4) अन्नधान्य उत्पादनात वाढ करणे
योजनेची ध्येयपूर्ती -
1) पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 3.6 % वार्षिक वृद्धी दर राहिला ( लक्ष - 2.1 , साध्य -3.6 )
2) या योजनेत चलनवाढ स्थिर झाली आणि चलनवाढीचा दर देखील कमी झाला
3) अन्नधान्य उत्पादन या मध्ये 66.9 मिलियन टन इतके उत्पादन झाले ( लक्ष - 61.6 मिलियन, साध्य - 66.
9 मिलियन टन)
खर्च - पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढील सार्वजनिक गोष्टीवरती खर्च करण्यात आला -
1) कृषी आणि सिंचन - 31 %
2) वाहतूक आणि दळणवळण - 27 %
3) सामाजिक सेवा - 22 %
पहिल्या पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाच्या घडामोडी -
1) उद्योग विकास व नियमन कायदा - 1951
2) Indian Institute of Technology (IIT) खरगपूर ची स्थापना - 1951
3) University Grand Commission ( UGC) ची स्थापना
4) Community Development Program ( CDP) समुदाय विकास कार्यक्रम ला सुरुवात
5) राष्ट्रीय विस्तार योजना (National Extension Service) ची सुरुवात
6) दामोदर खोरे विकास प्रकल्प
7) भाकरा नांगल धरण
8) हिराकुड धरण
9) कोसी धरण
10) सिंद्री येथे खत कारखाना
11) पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे Chittaranjan Locomotive Work ची सुरुवात या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना होता
12) पेरांबुर लोको वर्क्स - या ठिकाणी रेल्वेच्या डब्यांचा कारखाना सुरू करण्यात आला
13) पुण्यामधील पिंपरी या ठिकाणी हिंदुस्तान अँटिबायोटिक्स ची स्थापना करण्यात आली .
14) 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडिया नामकरण करण्यात आले .
15) 1955 मध्ये ICICI ची स्थापना करण्यात आली.
FAQ......
1) पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी ?
- पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 असा होता
2) पहिल्या पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोणते होते
- हेरॉड आणि डोमर हे प्रतिमान होते
3) पहिल्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय उत्पन्नाचे लक्ष किती होते ?
- पहिल्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय उत्पन्नाचे लक्ष 2.1 % इतके होते .
4) पहिल्या पंचवार्षिक योजनेत सार्वजनिक खर्च किती झाला?
- पहिल्या पंचवार्षिक योजनेत 2069 कोटी रुपयांचा सार्वजनिक खर्च करण्याचे लक्ष होते परंतु प्रत्यक्षात 1960 कोटी रुपयांचा खर्च झाला .
5) पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या राज्याची निर्मिती झाली ?
- पहिल्या पंचवार्षिक योजनेत आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती झाली
6) समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली ?
- 2 ऑक्टोबर 1952 पासून समुदाय विकास कार्यक्रमाची सुरुवात झाली .