जन्म - 14 एप्रिल 1891 मध्यप्रदेश मधील महू या ठिकाणी.
⭐मूळ गाव - महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेले आंबवडे.
⭐वडील रामजी मालोजी सपकाळ हे ब्रिटिश लष्करातील सुभेदार होते , निवृत होताना ते सुभेदार मेजर म्हणून निवृत्त झाले.
त्यांच्या आईंचे नाव "भीमाबाई" असे होते .
⭐त्यांचे सुरवातीच्या काळात शिक्षण रत्नागिरी जिल्ह्यात झाले .
⭐1913 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमधून B.A पदवी मिळवली त्यांचे विषय पर्शियन व इंग्रजी हे होते .
⭐सयाजीराव गायकवाड यांच्या सहाय्याने ते जुलै 1913 मध्ये न्यूयॉर्कमध्ये कोलंबिया विद्यापीठात शिकण्यास गेले .
⭐ 1915 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून M.A झाले .
⭐ पुढे त्यांनी लंडनमधील "London School of Economics & Political Science" या महाविद्यालयात प्रवेश घेतला .
⭐ पुढे त्यांनी बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानांमध्ये नोकरी केली.
⭐ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक नावाचे साप्ताहिक सुरू केले .
⭐ त्यांनी लंडन विद्यापीठातून MSC पूर्ण केली तिथे त्यांनी हा प्रबंध मांडला - Provincial Decentralization of Imperial finance in British India .
⭐ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जर्मनीमधील बॉन विद्यापीठांमध्ये कायद्याचा अभ्यास केला .
⭐ लंडन विद्यापीठाची त्यांनी D.sc ही पदवी मिळवली लंडन विद्यापीठाची D.sc ही पदवी मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते .
⭐ या वेळी त्यांनी The Probelm of Rupee हा प्रबंध सादर केला
⭐ 8 मार्च 1920 रोजी माणगाव जिल्हा कोल्हापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची परिषद भरली . या सभेला स्वतः छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते.
⭐ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जुलै 1924 मध्ये " मुंबई" या ठिकाणी " बहिष्कृत हितकारिनी सभा" नावाची संस्था काढली
उद्देश - अस्पृश्यांची भौतिक आणि नैतिक विकासाकडे वाटचाल करणे .
⭐ पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांताच्या.
लेजेस्लेस्टिव कौन्सिलचे सदस्य झाले ( 1926- 1936) .
⭐ बहिष्कृत हितकारिनी सभा -
ब्रीद वाक्य - शिका संघटीत व्हा, संघर्ष करा .
अध्यक्ष - सर चिमणलाल सेटलवाड
उपाध्यक्ष - मेयर निसिम
कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबसाहेब आंबेडकर हे स्वतः होते
या सभेच्या वतीने 1925 मध्ये "सोलापूर" मध्ये पहिले वसतिगृह सुरू करण्यात आले .
⭐ महाड सत्याग्रह - मार्च 1927 मध्ये महाड मध्ये चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केला
⭐ 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृति चे दहन
⭐ मार्च 1930 काळाराम मंदिर सत्याग्रह
⭐ गोलमेज परिषदेत सहभागी होण्याची साठी लंडन ला गेले 1930- 1934 .
⭐ पुणे करार - 1932 मध्ये पुणे करार झाला
⭐ ऑक्टोबर 1935 रोजी नाशिक मधील येवला येथील आयोजित सभे मध्ये त्यांनी घोषणा केली , " मी हिंदु म्हणून जन्मलो असलो तरी हिंदु म्हणून मरणार नाही" .
⭐ स्वतंत्र मजूर पक्ष -
स्थापना - 15 ऑगस्ट 1936
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः या पक्षाचे अध्यक्ष,संस्थापक, व खजिनदार होते .
या पक्षाचे मुखपत्र - जनता हे होते
1937 मधील प्रांतिक मंडळच्या निवडणुका या पक्षाने लढवल्या आणि मुंबई कायदमंडळा मधील 15 पैकी 11 जागा जिंकल्या आणि वऱ्हाड प्रांत मधील 15 पैकी 5 जागा जिंकल्या.
⭐ अखिल भारतीय शेड्युल कास्ट फेडरेशन ( All India Scheduled Cast Federation ) -
स्थापना - 1942
⭐ पीपल्स एज्युकेशन सोसायटी -
स्थापना - 1945
⭐ 1946 मध्ये मुंबई मध्ये सिध्दार्थ कॉलेज स्थापना
⭐ रिपब्लिकन पक्ष - 1956 - घोषणा
⭐ घटना निर्मिती -
29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समिती स्थापन झाली या समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर होते ,
याच समिती ने आपल्या देशाचे संविधान साकारले
⭐ वृत्तपत्र - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील वृत्तपत्र / पाक्षिक सुरू केले
मूकनायक -
बहिष्कृत भारत
जनता
समता
प्रबुद्ध भारत
⭐ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढील ग्रंथ लिहिले -
प्रॉब्लेम ऑफ रुपी
Thoughts On Pakistan
Casts in India
The Untouchables
Ranade ,Gandhi and Jinha
Riddles in Hinduism
State and Minorities
Small Holdings in India
Who were the Shudras
Buddha and his Dhamma
Annihilation of Cast
⭐ मृत्यू -
6 डिसेंबर 1956