1) Quadrilateral Security Dialogue ( QSO ) - या संघटनेला सर्वसाधारणतः "Quad" असे म्हणतात.
हा ऑस्ट्रेलिया, भारत, जपान, अमेरिका यांच्यातील धोरणात्मक सुरक्षा संवाद आहे जो सदस्य देशांमधील चर्चेद्वारे राखला जातो.
पार्श्वभूमी - 2007 मध्ये जपानचे पंतप्रधान -Shinzo Abe यांनी भारतीय पंतप्रधान ,ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ,आणि अमेरिकन उपाध्यक्ष यांच्या पाठिंब्याने संवाद सुरू केला होता.
सर्व 4 राष्ट्रांत लोकशाही राष्ट्र असण्याचा एक समान आधार सापडतो आणि हे सर्व सागरी व्यापार आणि सुरक्षेच्या समान हिताचे समर्थन करतात .
उद्देश - खुल्या आणि समृद्ध इंडो पॅसिफिक प्रदेशाची खात्री आणि त्याचे समर्थन करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे .
स्थापना - या संघटनेची चर्चा 2007 मध्ये सुरू झाली परंतु या संघटनेची स्थापना - 2017 मध्ये झाली.
HADR- Humanitarian Assistance & Disaster Relief - या अन्वये सदस्य देश इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय एजन्सी, खाजगी गैर-सरकारी संस्था यांच्यासोबत इंडो-पॅसिफिक प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापन चे समन्वय साधतील.