✶ Vedic Heritage Portal ( वेदिक हेरिटेज पोर्टल) - केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांनी नवी दिल्ली मध्ये वैदिक हेरिटेज पोर्टल चे सुरवात केली
उद्देश - पोर्टलचा उद्देश वेदांमध्ये असलेला संदेश पोहोचवणे हा आहे
या पोर्टल मुळे सर्वसामान्यांना वेदांचे ज्ञान मिळण्यास मदत होईल .
✶ उत्तराखंडमध्ये नवीन क्रीडा विद्यापीठ - उत्तराखंडचे मुख्यमंत्री यांनी घोषणा केली की कुमाऊँ क्षेत्रातील हलद्वानी या ठिकाणी नवीन क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल .
✶ इजिप्त - BRICS समर्थित New Development Bank चा इजिप्त नवीन सदस्य बनला आहे
New Development Bank - ही बँक पूर्वी BRICS विकास बँक म्हणून ओळखले जात होती
बँकेची स्थापना 2015 मध्ये BRICS देशांनी मिळून केली होती
मुख्यालय - शांघाई ( चीन) येथे आहे .
✶ Project Tiger - 1 एप्रिल 2023 रोजी या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण होतील .
व्याघ्र संवर्धनाला चालना देण्यासाठी या प्रकल्पाची सुरुवात 1 एप्रिल 1973 मध्ये झाली सुरुवातीला या प्रकल्पांतर्गत 9 व्याघ्र अभयारण्य यांचा समावेश होता .
सध्या सरकार काही वाघांचे कंबोडिया मध्ये स्थलांतरण करण्याचा विचारात आहे या देशात काही दशकापूर्वी ही प्रजाती नामशेष झाली आहे
काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे भारताने आफ्रिकेमधून चित्ते आणले होते .
✶ चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांचे निधन - हिंदी चित्रपट निर्माते प्रदीप सरकार यांचे आजारामुळे निधन झाले
त्यांचे परिणीता, मर्दानी, हेलिकॉप्टर एला हे चित्रपट विशेष उल्लेखनीय होते .
✶ Abel Prize - 2023 ( Abel पुरस्कार 2023) - Luis Caffarelli यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा Abel पुरस्कार जाहीर झाला .
Luis Caffarelli - यांचा जन्म अर्जेंटिनामध्ये झाला
यांना त्यांच्या " Partial Differential Equations Which By Relating One or More Unknown Functions and Their Derivatives " वरील कामामुळे हा पुरस्कार जाहीर झाला आहे .
Abel Prize विषयी -
हा पुरस्कार गणित या विषयातील उल्लेखनीय कामगिरी आणि संशोधन यासाठी दिला जातो
या पुरस्काराला गणित विषयातील नोबेल असे समजले जाते
त्याची सुरुवात 2003 मध्ये झाली
हा पुरस्कार नॉर्वे चे गणित तज्ञ Neil's Henrik Abel यांच्या नावावरून दिला जातो