✶ ओडिशा - या राज्याने केंद्रीय भूसंपादन कायद्यात सुधारणा करून सुलभता आणण्यासाठी दुरुस्ती विधेयक मांडले आहे
सरकारने विविध औद्योगिक आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी भूसंपादन पुनर्वसन आणि पुनर्वसन अधिनियम 2013 मध्ये पारदर्शकतेच्या न्याय्य मोबदल्याच्या अधिकारात सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
या कायद्यात सुधारणा करणारे ओडिशा हे 4 थे राज्य असेल यापूर्वी
1) गुजरात - 2016
2) महाराष्ट्र - 2018
3) कर्नाटक - 2019
या राज्यांनी सुधारणा केलेल्या आहेत .
✶ Siddhartha Mohanty - यांची लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या अध्यक्षपदासाठी Financial Services Institution Bureau ने शिफारस केली आहे.
Financial Services Institution Bureau -
स्थापना - 2022
2022 मध्ये केंद्र सरकारने आर्थिक सेवा विभाग अंतर्गत स्थापना केलेली ही एक सरकारी संस्था आहे
रचना - 1 सचिव आणि 4 अधिकारी यांचा समावेश आहे
या संस्थेने बँक बोर्ड ब्युरो ( BBB) ची जागा घेतली आहे
कार्य - सरकारच्या मालकीच्या वित्तीय संस्था मधील पदांसाठी योग्य व्यक्तीची निवड सुनिश्चित करणे ,
त्यांच्या नियुक्ती, बदली कार्यकाळ वाढवणे किंवा समाप्त करणे या संबंधित सल्ला सरकारला देणे .
✶ भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचा टीबी औषधावरील पेटंट चा कार्यकाळ वाढवण्यास नकार दिला
Bedaquiline - हे औषध टीबी च्या यंत्रणासाठी वापरले जाते
या औषधाच्या सहा महिन्यांच्या कोर्ससाठी $ 400 इतका खर्च येतो
हे औषध मल्टी ड्रग रेजिस्टंट टिबी रुग्ण यांचे साठी खूप उपयोगी आहे कारण या पेशंट वर पहिल्या औषधाने काम करणे बंद केले असते .
कंपनीचे पेटंट चा कार्यकाळ वाढवण्यास नकार दिल्यामुळे आता भारतात वेगवेगळ्या कंपन्या ही औषध बनवू शकतील आणि भारतातील रुग्णांना याचा फायदा मिळेल .
✶ International Liquid Mirror Telescope ( ILMT) - भारताने उत्तराखंडमधील देवस्थळ या ठिकाणी सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय द्रव दुर्बिणीचे उद्घाटन केले. (International Liquid Mirror Telescope) .
International Liquid Mirror Telescope - यामध्ये
4 मीटर व्यासाचा फिरणारा आरसा आहे जो द्रव्य मर्क्युरीच्या पातळ थराने बनलेला आहे .