✷❋ राजस्थान - राईट टू हेल्थ ( आरोग्य हक्क ) आरोग्य हक्क विधेयक विधानसभेत मंजूर करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे
या अंतर्गत राज्यातील रहिवाशांना सर्व सार्वजनिक आरोग्य सुविधा आणि निवडक खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत सेवा आणि आयपीडी सेवांचा लाभ घेता येणार आहे .
मुख्यमंत्री - अशोक गेहलोत .
❋Call Before U-DIG Application -
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॉल बी फॉर यू डिग ( Call Before U-DIG) हे ॲप लॉन्च करण्यात आले
या ॲपचा पुढाकार दूरसांच्या विभागाने घेतलेला आहे हे ॲप पाईपलाईन आणि तारा यासारख्या भूमिगत सेवांचे नवीन बांधकाम प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करेल
✰AIS For Taxpayer Application - By IT Department - AIS For Taxpayer हे मोबाईल ॲप्लिकेशन आयकर विभागाने लॉन्च केले आहे या ॲपच्या माध्यमातून सर्व करदात्यांना एकाच वेळी या त्यामुळे पुढील गोष्टींची एकाच वेळी माहिती मिळू शकेल जसे TDS, व्याज, dividends.
✰Digiclaim Settlement Module -
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज कृषी भवन येथे प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत राष्ट्रीय पीक विमा पोर्टल चे डिजिटल क्लेम सेटलमेंट लॉन्च केले
यामुळे सर्व विमाधारक शेतकऱ्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी आणि त्यांना शाश्वत आर्थिक प्रवाह आणि समर्थन प्रदान करण्यासाठी स्वयंचलित दावा निकाली काढण्याची प्रक्रिया निरंतर चालू राहील .
✰23 मार्च - जागतिक हवामान दिन -
जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्च रोजी साजरा केला जातो.
जागतिक हवामान संघटनेची स्थापना 23 मार्च 1950 रोजी झाली
जागतिक हवामान संघटना ही संयुक्त राष्ट्राचे संघटना आहे
जागतिक हवामान दिन थीम - ( World metrological day theme ) - The Future Of Weather, Climate and Water Across the Generation.